भाजीपाल्याचे भाव घसरले; सुकामेव्याच्या भावात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:59 AM2021-01-04T11:59:06+5:302021-01-04T12:02:23+5:30
Vegetables News भाजीपाल्याचे भाव घसरण झाली; मात्र थंडीचा जोर वाढल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाल्याने सुकामेव्याचे भाव वाढले आहेत.
अकोला: बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव घसरल्याचे चित्र आहे. भाजीपाल्याचे भाव घसरण झाली; मात्र थंडीचा जोर वाढल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाल्याने सुकामेव्याचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे, बाजारपेठमध्ये फळांच्या दरात वाढ झाली असल्याचे चित्र आहे, तर किराणा बाजारात सर्व डाळींचे भाव वाढल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे. सोयाबीन व इतर तेलाच्या किमतीत कमी-अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे.
बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला असून, गत सप्ताहाप्रमाणेच पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कांदा, बटाट्याच्या दरही आता कमी झाले आहेत. आता बहुतांश भाज्यांचे दर कमी झालेले आहेत. फळबाजारात जवळपास पपई वगळता इतर फळांचे दर चढेच आहेत. पपई २० ते २५ रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. सफरचंदही १०० रुपये किलोने विक्री होत असल्याचे चित्र आहे. सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाल्याने खारीक, खोबऱ्याच्या भावात वाढ झाली आहे. खारीक जवळपास २१० ते २८० रुपये प्रति किलो विक्री होत आहे.
भाजीपाल्याचे भाव
कांदे ४० ते ४५ रुपये, लसूण १०० ते १२० रुपये, फुलकोबी २० रुपये प्रति किलो, वांगी १० ते २० रुपये, मेथी १० ते २० रुपये, पालक २० ते ३० रुपये, दाेडके २० ते ३० रुपये, कोथिंबीर २० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, कारली ४० ते ५० रुपये, बटाटे २० ते ३० रुपये प्रति किलोदराने मिळत आहे.