पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी काेविड लस का घेतली नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:16 AM2021-01-18T04:16:30+5:302021-01-18T04:16:30+5:30
अकाेला : कोरनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. फ्रंटलाइन काेराेनायाेद्ध्यांसाठी पहिल्या टप्प्यात हे लसीकरण ...
अकाेला : कोरनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. फ्रंटलाइन काेराेनायाेद्ध्यांसाठी पहिल्या टप्प्यात हे लसीकरण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही काेराेनायाेद्धा असतानाही त्यांनी लस का घेतली नाही, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. लससंदर्भात अनेक शास्रज्ञांमध्ये मतभेद आहेत, अशा स्थितीत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी सर्वांत आधी लस घेऊन लोकांमध्ये वस्तुपाठ ठेवला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानच या दाेघांनी ते लस कधी घेणार हे जाहीर करावे, असे आव्हान दिले.
त्यांच्या अकोला येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले की, अशा लसीकरण करण्याबाबत अनेक टप्पे मी पाहिले आहेत यापूर्वी लसीकरण झाले त्यामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी आधी लस घेतली असून, लोकांना विश्वास दिला हाेता. आता मात्र केवळ ढाेल वाजविण्याचे प्रकार सुरू आहे. ज्याप्रमाणे जुन्या काळात राजा शिकारीला जात असे तेव्हा ढाेल वाजविले जात हाेते. राज्याला वाटले तर शिकार केली जात असे तसाचा प्रकार आता सुरू आहे. केवळ लसीकरणाचे ढाेल वाजविले जात आहेत. जागतिक आराेग्य संघटनेच्या प्रमुखांनी स्पष्ट केल्याप्रमाणे इतर देशांनी जसे लसीकरणाचे नियाेजन केले तसे आपल्या देशात करणे अपेक्षित हाेते, मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही, असा आराेप त्यांनी केला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री लस घेतली असती तर लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला असता. दुसरे म्हणजे या दोन्ही नेत्यांना कोराेना झालेला नाही त्यामुळे कोराेना झाला नाही तर लक्ष देण्याची गरज नाही, असाही समज पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रियतेच्या निकषामध्ये पंतप्रधान क्रमांक एक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे त्यांनी लस घेण्याचे नियाेजन करावे व त्याचे थेट प्रेक्षपण करावे असे आवाहनही त्यांनी केले.
बाॅक्स
काेरानायाेद्धा कर्मचाऱ्यांबाबत सरकार असंवेदनशील
काेराेना उद्रेकाच्या काळात ज्या रुग्णांना डाॅक्टर हातही लावायला तयार नव्हते अशा रुग्णांसाठी तात्परुत्या स्वरूपात नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी माेलाची साथ दिली. आता काेराेना संपलेला नाही, मात्र तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे धाेरण सरकारने स्वीकारले आहे हे असंवेदनशीलतेचे लक्षण असल्याचे मत ॲड आंबेडकर यांनी व्यक्त केले.
बाॅक्स
धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून अभय
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आराेपानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे ट्विट केले हाेते. तेव्हाच मुंडे यांना अभय दिले जाईल, असे स्पष्ट झाले हाेते त्यावर आता शिक्कामाेर्तब झाले आहे अशा शब्दांत ॲड आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला टाेला लगावला आहे. माझ्या पक्षात मुंडे असते तर राजीनामा घेतला असता असेही ते म्हणाले.