प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राला कुलूप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:52+5:302021-09-17T04:23:52+5:30
अकोट तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा भरणा केला. गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. विमा ...
अकोट तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा भरणा केला. गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, तो नंबर लागत नाही. त्यामुळे शेतकरी अतिवृष्टीची माहिती देण्याकरिता गेले असता प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राला कुलूप लावलेले आढळले. याठिकाणी कोणी कर्मचारी हजर राहत नाही. उलट नंतर विमा प्रतिनिधी हे पत्र दिले नाही. संपर्क केला नाही असे कारणे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. खरीप हंगामात बागायती व फळ पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. अतिवृष्टी, नैसर्गिकरित्या आलेल्या संकटाची माहिती त्वरित कळविण्यात यावी. जेणेकरुन पंचनामा, पाहणी करण्यात येणार असल्याच्या सूचना दिल्या जातात,परंतु वेळप्रसंगी विमा प्रतिनिधीशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नाही. शिवाय कार्यालय कुलूप बंद आढळत असल्याने संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी छावा संघटना तालुका प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर पाटील मानकर व शेतकऱ्यांनी केली आहे.
फाेटो:
१६३ गावांतील शेतकऱ्यांना फटका
तालुक्यातील ७२ हजार २९० हेक्टर खरीप हंगामाचे क्षेत्रफळ आहे. अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील अकोलखेड,पणज,उमरा, आसेगाव बाजार,मुडगांव,कुटासा, चोहट्टा बाजार या मंडळातील १६३ गावातील शेतकऱ्यांना फटका बसला. तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये तूर,उडीद,मूग,सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. इतर पिकांचे तुलनेत कपाशी, सोयाबीन नुकसान जास्त आहे. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.