अकोट फैलातील जुगारावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:37 AM2017-09-22T01:37:24+5:302017-09-22T01:37:24+5:30
अकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर पीडित कॉलनीतील गोवरशहा याच्या राहत्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी छापा टाकून सात जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसांत विशेष पथकाची ही तिसरी कारवाई आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पूरपीडित कॉलनीतील गोवरशहा याच्या राहत्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह छापा टाकून सात जणांना अटक केली. यामध्ये चिखलपुरा येथील रहिवासी ईश्वर रामभाऊ तायडे, अकोट फैलातील रहिवासी राजीव शिवराम खवले, बिरामशहा बाबरशहा, प्रकाश लक्ष्मण रंगारी, शेख रमरू शेख थारू, खरप येथील ओंकार शिवाजी खिल्लारे, गवळीपुरा येथील बादशहाला मोरवाल या सात जणांना अटक केली. या सातही जुगारींना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. या सात जुगारींकडून तब्बल ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने दोन दिवसांत तीन जुगार अड्डय़ांवर छापेमारी करीत १७ जुगारींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह केली.