महिला बचतगटांच्या सक्षमीकरणास प्राधान्य -  सौरभ कटियार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:01 AM2020-09-06T11:01:21+5:302020-09-06T11:01:30+5:30

रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Priority for empowerment of women self help groups - Saurabh Katiyar | महिला बचतगटांच्या सक्षमीकरणास प्राधान्य -  सौरभ कटियार

महिला बचतगटांच्या सक्षमीकरणास प्राधान्य -  सौरभ कटियार

Next

- संतोष येलकर

 अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि विकासकामांना गती देण्यासह उमेद अभियानांतर्गत महिला बचतगटांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांचे काय नियोजन आहे?
जिल्ह्यात ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषदमार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये सद्यस्थितीत गावागावांमध्ये आरोग्य तपासणी तसेच ‘कोरोना’ची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट आणि थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत. जास्तीत जास्त तपासणी करून वाढती रुग्णसंख्या कमी करणे आणि मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा परिषदेचा अखर्चित निधी शासनाकडे परत जाणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात आली का?
विविध योजना आणि विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेला निधी अखर्चित राहणार नाही, यासंदर्भात आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. उपलब्ध निधी फेबु्रवारी अखेरपर्यंत खर्च करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले असून, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामांबाबत काय भूमिका आहे?
जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांसह शासनांच्या विविध योजनांची जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करणे विकासकामे मार्गी लावण्याची गरज आहे. त्यानुषंगाने या कामाला गती देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामीण भागातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासह नागरिकांची कामे वेळेवर झाली पाहिजे तसेच विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदमार्फत वेगळी संकल्पना राबविण्याचा मानस आहे का?
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील महिला बचतगटांचे सक्षमीकरण करणे, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. महिला बचतगटांना प्रशिक्षण देऊन, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष कार्यक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.


ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांचे नियोजन आहे का?
जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येणाºया निधीतून नळजोडणी उपलब्ध नसलेल्या घरांना तातडीने नळजोडणी उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात येणार आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसह जलजीवन मिशन अंतर्गत उपलब्ध होणाºया निधीतून पाणीपुरवठयाची कामे करण्यात येणार आहेत.

योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाºयांच्या समन्वयातून कामे करण्यात येत आहेत.
सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

 

Web Title: Priority for empowerment of women self help groups - Saurabh Katiyar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.