‘मिशन दिलासा’कडे प्रशासनाचा कानाडोळा; मोर्णा महोत्सवाला देण्यात आले प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:19 PM2019-01-08T14:19:47+5:302019-01-08T14:19:52+5:30
अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत गत वर्षभराच्या कालावधीत मोर्णा स्वच्छता अभियान आणि नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला प्राधान्य देण्यात आले असले तरी, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन दिलासा’कडे मात्र प्रशासनाकडूनच कानाडोळा करण्यात आला आहे.
अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत गत वर्षभराच्या कालावधीत मोर्णा स्वच्छता अभियान आणि नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला प्राधान्य देण्यात आले असले तरी, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन दिलासा’कडे मात्र प्रशासनाकडूनच कानाडोळा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनामार्फत ‘मिशन दिलासा’ सुरू करण्यात आले. त्यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणाºया साहित्याचे वाटप करणे तसेच शेतकरी आत्महत्या होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत होता. गत दीड वर्षाच्या कालावधीत मात्र शेतकरी कुटुंबात आत्महत्या होणार नाही, यासाठी गावागावांमध्ये प्रबोधन करण्याचा उपक्रम बंद पडला आहे. तसेच लोकसहभागातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगाराभिमुख साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमाची गतीदेखील मंदावली आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्यातील चार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पीठ गिरणी (चक्की), शिलाई मशीन असे रोजगार उपलब्ध करून देण्याचे साहित्य वाटप करण्यात आले होते. त्यानंतर मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणाºया साहित्याचे वाटप करण्यात आले नाही. त्यानुषंगाने गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हा प्रशासनामार्फत मोर्णा स्वच्छता मोहीम आणि नुकताच पार पडलेला मोर्णा महोत्सवाला प्राधान्य देण्यात आले असले तरी, जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा देणाºया ‘मिशन दिलासा’कडे प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात आल्याचे वास्तव आहे.
‘मिशन दिलासा’ जिल्ह्यातील शेतकºयांच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प आहे. शेतकºयांना दिलासा देणाºया या उपक्रमाला अधिकारी-कर्मचाºयांसह जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे मोर्णा महोत्सवाप्रमाणेच ‘मिशन दिलासा’कडेही जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
- प्रशांत गावंडे
शेतकरी जागर मंच, अकोला.