कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यास कैद्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:38 PM2018-07-31T12:38:37+5:302018-07-31T12:41:38+5:30
अकोला : मध्यवर्ती कारागृहात विनयभंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
अकोला : मध्यवर्ती कारागृहात विनयभंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अजय गावंडे नामक कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय माणिक गावंडे याला युवतीच्या विनयभंग प्रकरणात शिक्षा झालेली आहे. गत अनेक दिवसांपासून तो शिक्षा भोगत असताना सोमवारी दुपारी कैद्यांची डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी सुरू होती. या दरम्यान कैदी अजय गावंडे याने तपासणी करीत असलेल्या दोन डॉक्टरांशी वाद घातला. वाद वाढत असल्याचे पाहून पोलीस कर्मचारी सुरेश मदन खरात हे कैदी गावंडे याला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, गावंडेने अचानक पोलीस कर्मचारी खरात यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केल्याने जखमी झालेल्या खरात यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीवरून तसेच खरात यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी अजय गावंडेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.