सर्वोपचार रुग्णालयातून कैदी महिलेचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 03:34 PM2019-10-11T15:34:07+5:302019-10-11T15:34:11+5:30
. दुसरी महिला पोलीस कर्मचारी मोबाइलमध्ये गुंतलेली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अकोला : वाशिम कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेने सर्वोपचार रुग्णालयातून पलायन केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. वाशिम पोलिसांनी आता या महिलेचा शोध सुरू केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी उषा सुभाष गडणे या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली असून, ती वाशिम जिल्हा कारागृहात कैदी आहे. या दरम्यान तिने फिनाइन प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ८ आॅक्टोबर रोजी रात्री उशिरा तिला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक- ७ मध्ये या कैदी महिलेवर उपचार सुरू असताना तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाखरे आणि क्षीरसागर नामक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी दोन्ही महिला कर्मचारी तिला दिसल्या नाही. याच संधीचा फायदा घेत तिने वॉर्डातून पळ काढला. यामधील एक महिला पोलीस कर्मचारी परत आली असता तिला कैदी महिला पळून गेल्याचे दिसले. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात खळबळ माजली. यासंदर्भात महिला पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी एका महिला पोलीस कर्मचाºयाच्या पोटात त्रास असल्याने औषध आणण्यासाठी बाहेर गेल्याची माहिती दिली. दुसरी महिला पोलीस कर्मचारी मोबाइलमध्ये गुंतलेली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही कैदी महिला पळाल्याने य दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवणार असून, आता वाशिम पोलिसांनी पळून गेलेल्या उषा गडण यांचा शोध सुरू केला आहे.