खासगी बस प्रवाश्यांविना उभ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:21+5:302021-04-16T04:18:21+5:30
----------------------------------------------- फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा अकोला : शहरातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या तहसील कार्यालयाच्या समोर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत ...
-----------------------------------------------
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकोला : शहरातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या तहसील कार्यालयाच्या समोर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जिल्ह्यात कडक संचारबंदी असतानाही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक शासकीय कामानिमित्त येथे येत आहेत. या रस्त्यावरील दुकान, तहसीलची कामे करणाऱ्यांकडे गर्दी होत आहे.
-------------------------------------------------
औरंगाबादची अद्रक अकोल्यात!
अकोला : जिल्ह्यात अद्रकाची लागवड कमी आहे. त्यातच पोषक वातावरण नसल्याने अद्रकाचा आकार लहान आहे. त्यामुळे बाजार समितीत औरंगाबाद येथून अद्रकाची आवक सुरू आहे. सद्यस्थितीत अद्रकाला चांगला भाव मिळत आहे.
-------------------------------------------------
आंब्याचे दर घसरले!
अकोला : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १५० रुपये किलो असणारा बदाम आंबा आता १०० रुपये किलो मिळत आहे. बाजारात आंब्याची आवक वाढली असून, त्या प्रमाणात मागणीही वाढत आहे. आवक वाढल्याने दर घसरले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.