खासगी सावकारांनी वाटले ३६ काेटी ३५ लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 11:08 AM2021-01-07T11:08:42+5:302021-01-07T11:12:29+5:30

Akola News सर्वाधिक कर्ज हे अकाेला तालुक्यात वाटप झालेले आहे.

Private lenders distribute a loan of Rs 36.35 crore | खासगी सावकारांनी वाटले ३६ काेटी ३५ लाखांचे कर्ज

खासगी सावकारांनी वाटले ३६ काेटी ३५ लाखांचे कर्ज

Next
ठळक मुद्देसर्वाधिक कर्जदारांनी तारण ठेवूनच कर्ज घेतले आहे.२ लाख १९ हजारांचे कर्ज हे बिगर तारणावर दिले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : जिल्ह्यात कृषक व अकृषक क्षेत्रात १४८ परवानाधारक सावकारांनी ३६ कोटी ३५ लाख १४ हजार रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून माेठया प्रमाणात कर्जवाटप हाेत असून, सर्वाधिक कर्ज हे अकाेला तालुक्यात वाटप झालेले आहे. या सावकरांकडून जिल्ह्यातील ४५ हजार ७७७ लाेकांनी कर्ज घेतले असून, त्यामध्ये सर्वाधिक कर्जदारांनी तारण ठेवूनच कर्ज घेतले आहे. या सावकारांकडून कृषी कर्जाचे वितरण झालेलेे नाही हे विशेष सावकारांनी वाटलेल्या कजार्मध्ये ३६ कोटी २० लाख १६ हजार रुपयांचे कर्ज हे तारणावर दिले असून, १२६ लाेकांना १२ लाख १९ हजारांचे कर्ज हे बिगर तारणावर दिले आहे. अवैध सावकारीबाबतच नवा अधिनियम लागू झाल्यापासून प्राप्त तक्रारी नंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालय या प्रकरणात चाैकशी करून तक्रार याेग्य असल्यास गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवाळीपूर्वीच अवैध सावकारांवर उपनिबंधक कार्यालयाने धाड सत्र राबविले हाेते हे विशेष.

अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी

अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला ९ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो.

अकाेला ७७

बार्शीटाकळी १०

पातूर ०६

बाळापूर २२

अकाेट ०७

तेल्हारा ११

मूर्तिजापूर १५

Web Title: Private lenders distribute a loan of Rs 36.35 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.