२० टक्के अनुदानित शाळा फेरतपासणी समितीचा खासगी शिक्षक संघटनेकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:16+5:302020-12-15T04:35:16+5:30
यावेळी शासन वारंवार तपासण्याच्या फेऱ्या करून शिक्षकांवर अन्याय करत असून, शिक्षणमंत्र्यांनी कोणतीही तपासणी न करता अनुदान देण्याची घोषणा केली ...
यावेळी शासन वारंवार तपासण्याच्या फेऱ्या करून शिक्षकांवर अन्याय करत असून, शिक्षणमंत्र्यांनी कोणतीही तपासणी न करता अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाकडून गठित करण्यात आलेले मंत्रालयीन स्तरावरील पथकाद्वारे सुरू असलेली तपासणी हे निषेधार्थ असून शिक्षकांच्या भावनांशी खेळ आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेने अकोल्यामध्ये दाखल झालेल्या तपासणी पथकाची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व राज्य खासगी शिक्षक संघटनेने निषेध व्यक्त केला. यावेळी संघटनेने तपासणीचा फार्स बंद करून शासनाने तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी तपासणी समितीसमोर केली. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष मनीष गावंडे, राज्य सहसचिव नरेंद्र चिमणकर, राज्य सहसचिव अविनाश मते, राज्य सहसचिव गजानन सवडतकर, राज्य सहसचिव कैलास सुरळकर, जिल्हाध्यक्ष वसीम मुजाहिद, दत्ता घोंगे, कपिलेश आंबेकर, फारूक, इफ्तेकार, जुनेद, फईम यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
फोटो: