विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता
By admin | Published: June 27, 2016 02:46 AM2016-06-27T02:46:55+5:302016-06-27T02:46:55+5:30
भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज.
अकोला : नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा रविवारी आणखी पुढे सरकली असून, उत्तर अरबी समुद्रचा आणखी काही भाग व्यापला आहे. गुजरात राज्याच्या दक्षिण भागात, पश्चिम मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात तसेच पूर्व राजस्थानच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे. महाराष्ट्रातही मागील २४ तासांत कोकणात चांगला पाऊस झाला. सोमवार व मंगळवारी विदर्भातील बहुतांश भागात पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील २४ तासांत रविवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात बर्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.