गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची समस्या शासनाकडे मांडणार: सिरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:37+5:302021-03-24T04:16:37+5:30
आधीच विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे २० मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीने संकटामध्ये टाकले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना ...
आधीच विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे २० मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीने संकटामध्ये टाकले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता आले, सदर कर्ज फेडण्याच्या तयारीमध्ये शेतकरी असताना, गारपिटीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे सोसायटी, बँका आदींचे कर्ज शेतकरी कसा फेडेल. कर्जच फेडले नाही तर नव्याने कर्ज मिळणे कठीण होईल. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार करून बाळापूर विधानसभेचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बळीराम सिरस्कार यांनी शेकापूर, रामनगर, कार्ला, आलेगाव, गोळेगाव आदी गावातील पीक नुकसानाची पाहणी केली. शेतकऱ्यांची समस्या शासनाकडे मांडून शासनाकडून एकरी ५०,००० रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार सिरस्कार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन इंगळे, लक्ष्मण खंडारे, ज्ञानेश्वर ताले, विजय बोचरे, सुनील तायडे, भारत चिकटे, दिलीप काळपांडे, शेतकरी शेषराव राठोड, प्रकाश राठोड, बोंदिराम राठोड, शंकर राठोड, उमेश राठीड, जहागीरदारसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
फोटो: