तपासातील अडचणी वाढल्या!

By admin | Published: September 17, 2014 02:42 AM2014-09-17T02:42:09+5:302014-09-17T02:42:09+5:30

१५ लाख रोकड लंपास प्रकरण; कोषागार कार्यालयातील तपासही अधातंरीच.

Problems in the investigation increased! | तपासातील अडचणी वाढल्या!

तपासातील अडचणी वाढल्या!

Next

अकोला: १५ लाख रोकड लंपास प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी विविध ठिकाणांहून मिळविलेल्या सीसी कॅमेर्‍यांमधील चित्रणाचा त्यांना कोणताही लाभ होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तपासही ह्यजैसे थेह्णच आहे.
पारसचे सरपंच संतोष दांदळे यांची कार अडवून अज्ञात चोरट्यांनी कारमधील १५ लाखाची रोकड उडविल्याची घटना शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घडली होती. कारचा चालक दिलीप बोचरे याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका चौकापर्यंंतच्या मार्गावरील सीसी कॅमेर्‍यांमधील चित्रणसुद्धा मिळविले. या चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा सुगावा मिळतो का, त्यासाठी प्रयत्न केले; परंतु सीसी कॅमेर्‍यांमध्ये मोटारसायकलवर आरोपी कुठेच दिसत नसल्याने, आरोपींचा शोध घ्यावा तरी कसा,असा प्रश्न पोलिसांना भेडसावत आहेत. या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे; परंतु दोन्ही पथकांना याप्रकरणी कोणताच सुगावा अद्यापपर्यंंत मिळालेला नाही.

** कोषागार कार्यालयातील दरोड्याचाही तपास जैसे थे
जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभागातील दरोड्याचाही अद्यापपर्यंंत तपास लागलेला नाही. याप्रकरणीही पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र तयार केले होते; परंतु या प्रकरणाच्या तपासामध्येही फारसी प्रगती झालेली नाही. पोलिसांकडून कोषागार दरोडा व १५ लाख रोकड लंपास प्रकरणी लवकरच आरोपी गजाआड करू, असा दावा करण्यात येतो; मात्र या दोन्ही प्रकरणांचा तपास कर ताना पोलिसांना अद्यापपर्यंंत कोणतेच धागेदोरे गवसले नाहीत.

Web Title: Problems in the investigation increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.