नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून
By admin | Published: July 13, 2015 02:01 AM2015-07-13T02:01:30+5:302015-07-13T02:01:30+5:30
ग्रामपंचायतींची निवडणूकीचे ऑनलाइन भरावे लागणार नामनिर्देशनपत्र.
अकोला: जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ऑनलाइन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, १३ जुलैपासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये सुरू होत आहे. ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरून, त्याची प्रिंट उमेदवारांना तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्यांकडे सादर करावी लागणार आहे.
जिल्हय़ातील ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणार्या अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणुकीसाठी ऑनलाइन नामनिर्देशनपत्र दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू होत आहे. १८ व १९ जुलै हे सुटीचे दोन दिवस वगळता २0 जुलैपर्यंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष किंवा इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरता येणार आहे. ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर त्याची काढून उमेदवारांना तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्यांकडे सादर करावी लागणार आहे.