महापालिकेच्या आकृतिबंधाची प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:13 AM2017-09-27T01:13:04+5:302017-09-27T01:14:07+5:30

अकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदू नामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी आहेत किती, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु मागील पाच महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे.

The process of the formation of the corporation jam | महापालिकेच्या आकृतिबंधाची प्रक्रिया ठप्प

महापालिकेच्या आकृतिबंधाची प्रक्रिया ठप्प

Next
ठळक मुद्देकर्मचार्‍यांच्या संख्येचा ताळमेळ जमेना!कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदू नामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी आहेत किती, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु मागील पाच महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प पडल्याची माहिती आहे. 
महापालिकाच नव्हे, तर इतरही प्रशासकीय यंत्रणांमध्ये तेथील उपलब्ध कर्मचार्‍यांच्या संख्येनुसार कामकाज पार पडते. अर्थात, त्या-त्या विभागात कार्यरत कर्मचारी किती आणि ते कोणत्या संवर्गातील आहेत, ही बाब महत्त्वाची ठरते. बिंदू नामावली प्रक्रिया असो किंवा पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याकडे ‘मास्टरी’ असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळेच मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाक डे सादर केला आणि त्याला मंजुरी मिळाली. बिंदू नामावली अंतर्गत सरळसेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपाच्या जलप्रदाय विभाग, नगररचना, बांधकाम आदी विभागात तांत्रिक संवर्गातील कर्मचार्‍यांची अपुरी संख्या पाहता आयुक्त लहाने यांनी तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले. यादरम्यान, महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण कर्मचारी किती आणि विभागवार कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याची अचूक माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले. ही बाब पाहता महापालिकेचा आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. आकृतिबंधाची प्रक्रिया क्लिष्ट असली, तरी त्याची गरज ओळखून सामान्य प्रशासन विभागामार्फत ही प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती. अवघ्या दोन-तीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील जुजबी माहिती प्रशासनाकडे सादर केली. त्यानंतर कोठे माशी शिंक ली देव जाणे, ही प्रक्रियाच ठप्प पडल्याचे दिसून येत आहे. 

कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार
महापालिकेचा आकृतिबंध तयार नसल्यामुळे कामचुकार कर्मचार्‍यांमध्ये आनंदीआनंद आहे. अनेक कर्मचारी बिळात दडून बसल्यासारखे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. मनपाच्या आस्थापनेवरील २ हजार २00 कर्मचारी पाहता बहुतांश कर्मचारी दिवसभर असतात तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो. अशा क ामचुकार कर्मचार्‍यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू करण्याची नितांत गरज आहे. 
-

Web Title: The process of the formation of the corporation jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.