जमावबंदी असतानाही काढली मिरवणूक; आमदार मिटकरीसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 10:51 AM2021-02-20T10:51:07+5:302021-02-20T10:53:14+5:30

MLA Amol Mitkari दहीहांडा पाेलीस ठाण्यात आमदार अमोल मिटकरी यांच्यासह ३०० ते ४०० लाेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Procession removed despite curfew; Crimes filed against 300 to 400 people including MLA Mitkari | जमावबंदी असतानाही काढली मिरवणूक; आमदार मिटकरीसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल

जमावबंदी असतानाही काढली मिरवणूक; आमदार मिटकरीसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देकुटासा येथे शिवजयंतीची जल्लाेषात तयारी करण्यात आली. मिटकरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मिरणुकीत शेकडो लाेकांनी सहभाग नाेंदविला.

 अकाेट: कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी नसताना अकाेट तालुक्यातील कुटासा येथे शिवजयंतीनिमित्त विधान परिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)  यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकाेडा लाेकांचा सहभाग हाेता. दरम्यान, लाेकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्यामुळे दहीहांडा पाेलीस ठाण्यात आमदार अमोल मिटकरी यांच्यासह ३०० ते ४०० लाेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जिल्ह्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी झाली; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. तरीही या नियमांना पायदळी तुडविल्याचे चित्र शुक्रवारी जिल्ह्यातील कुटासा येथे पाहावयास मिळाले. अकोट तालुक्यातील कुटासा येथे शिवजयंतीची जल्लाेषात तयारी करण्यात आली. आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मिरणुकीत शेकडो लाेकांनी सहभाग नाेंदविला. दरम्यान, मिरवणुकीत फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार अमोल अमोल मिटकरी यांच्यासह अन्य ३०० ते ४०० जणांवर दहिहंडा पोलिसांनी ही करवाई केली आहे. (फोटो)

Web Title: Procession removed despite curfew; Crimes filed against 300 to 400 people including MLA Mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.