उत्पादन शुल्क विभागाचा दारूअड्डय़ावर छापा

By admin | Published: December 6, 2014 12:01 AM2014-12-06T00:01:08+5:302014-12-06T00:01:08+5:30

१२ हजारांचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक

The production fee department's raid on the liquor barricade | उत्पादन शुल्क विभागाचा दारूअड्डय़ावर छापा

उत्पादन शुल्क विभागाचा दारूअड्डय़ावर छापा

Next

पिंजर (अकोला) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला येथील भरारी पथकाने ५ डिसेंबर रोजी बाश्रीटाकळी तालुक्यातील बिहाडमाथा येथील गावठी दारू गाळण्याच्या अड्डय़ावर छापा टाकून १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तेथून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाननजीक असलेल्या बिहाडमाथा परिसरात गावठी दारू गाळण्याचा अड्डा बिनबोभाट सुरू असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला येथील पथकास मिळाली. त्यावरून या विभागाच्या भरारी पथकाने शुकवारी दुपारी दारूअड्डय़ावर छापा टाकला. यावेळी तेथे दारू गाळली जात होती. भरारी पथकाने ४८0 लीटर मोहामाच, १२ लीटर गावठी दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १२ हजार २00 रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. संतोष किसन मागोडे (३८) व भगवान संजय मागोडे (२५) दोघेही रा. सायखेड, ता. बाश्रीटाकळी यांना घटनास्थळाहून मुंबई दारूबंदी कायद्याच्या ६५ ई कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. के. फुसे, दुय्यम निरीक्षक व्ही. आर. बरडे, सहायक दुय्यम निरीक्षक भुजंगराव सिरसाट, आर. डी. पाटणे, पी. डी. धांडे, विशाल बांबलकर, सोमेश्‍वर जाधव, कोमल शिंदे, बबिता गवळी, प्रवीण गजभार (चालक) आदी कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. या विभागाच्या सततच्या कारवायांमुळे तालुक्यातील गावठी दारू गाळणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: The production fee department's raid on the liquor barricade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.