तासीका तत्त्वावरील प्राध्यापक मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 02:02 PM2019-07-26T14:02:23+5:302019-07-26T14:06:59+5:30
नविन सत्र सुरू होउनही या प्राध्यापकांना मानधनची प्रतीक्षा आहे.
अकोला : शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये नियुक्त केलेल्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मानधनापासून वंचित असल्याचे चित्र आहे. नविन सत्र सुरू होउनही या प्राध्यापकांना मानधनची प्रतीक्षा आहे. शासनाने नाव्हेंबर महिन्यात शासनादेश काढून दरमहिन्याला वेतन देण्याचे निश्चित केले होते. मात्र, हा शासनादेशही कागदावरच असल्याचे चित्र आहे.
संत गाडगे बाबा विद्यापीठांतर्गंत शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अनुदानीत महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती.या प्राध्यापकांची नियुक्ती करताना संबधीत अधिकाऱ्यांची परवानगही घेण्यात आल्या होत्या. यापैकी काही महाविद्यालयांमध्ये तासिक तत्त्वावरील प्राध्यापकांना अर्ध्या सत्राचे मानधन देण्यात आले तर काहींना अर्ध्या सत्राचेही मानधन मिळाले नाही. तसेच शासनाने नोव्हेंबर मध्ये शासनादेश काढून तासिकांच्या मानधनात वाढ केली होती. तसेच दर महिन्याला शालार्थ वेतन प्रणालीने मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने तासिक तत्त्वावरील प्राध्यापकांना नविन सत्र सुरू होउनही मानधन मिळालेले नाही. तांत्रिक अडचणीत काही प्रस्ताव अडकल्याने तासिक तत्त्वारील प्राध्यापकांचे मानधन रखडल्याची माहिती आहे. त्यावर तातडीने तोडगा काढून मानधन देण्याची मागणी तासिक तत्त्वारील प्राध्यापकांनी केली आहे.
उपासमारीची वेळ
तासिका तत्वावरील प्राध्यापकांना एका तासिकेचे २४० रुपये मिळत होते. तेही वर्षाच्या शेवटी मानधन मिळत असल्याने तासिक तत्त्वारील प्राध्यापक आर्थीक संकटात होते. शासनाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करून प्रती तास ५०० रुपये केले आहे. मानधनात वाढ केली असली तरी अंमलबजावणी होत नसल्याने तासिक तत्त्वारील प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नियमीत प्राध्यापकांचे लाखो रुपयाचे वेतन दर महिन्याला नियमीत होते. दुसरीक डे तासिका तत्त्वारील प्राध्यापकांचे वर्षाचे मानधनही मिळत नसल्याचे चित्र आहे.