प्रतिबंधित मांस जप्त, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:19 AM2021-04-21T04:19:38+5:302021-04-21T04:19:38+5:30
तालुक्यातील ग्राम खेल कृष्णाजी (पंचगव्हाण) येथे गुरांची कत्तल करीत करून मांस विक्री करीत असल्याची माहिती तेल्हारा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ...
तालुक्यातील ग्राम खेल कृष्णाजी (पंचगव्हाण) येथे गुरांची कत्तल करीत करून मांस विक्री करीत असल्याची माहिती तेल्हारा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी २० एप्रिल रोजी सकाळी छापा घालून दोघांना मांस विक्री करताना रंगेहात पकडले.
खेलकृष्णाजी( पंचगव्हाण) येथे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस कर्मचारी राजू इंगळे, अमोल नंदाने, सागर मोरे यांनी २० एप्रिल रोजी सकाळी छापा घालून आरोपी जब्बर कुरेशी नसिर कुरेशी(३१) शेख इमरान शेख उस्मान(२५) रा. खेल कृष्णाजी (पंचगव्हाण )यांना अटक केली. त्यांच्याकडून प्रतिबंधित मांस जप्त करून नष्ट केले. फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५ क, ९ अ तसेच सहकलम भादंवि कलम ४२९ नुसार गुन्हा दाखल केला.