पाण्याच्या वादातून युवकावर रोखला देशी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:27 AM2017-08-10T01:27:16+5:302017-08-10T01:27:16+5:30
अकोला : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या युवकासोबत आरोपीने पाण्याच्या बाटलीवरून वाद घातल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यानंतर आरोपीने युवकास जीवे मारण्याची धमकी देऊन देशीकट्टा रोखला. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी देशीकट्टय़ासह आरोपीला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

डाबकी रोडवरील राव नगर येथील रहिवासी राजेश बाजीराव राऊत, असे आरोपीचे नाव आहे. राजेश याचे घर मल्हार बारच्या जवळ आहे. या बारमध्ये विशाल ऊर्फ जितू मोहन चोपडे हा जेवणासाठी गेला होता. यावेळी पाण्याच्या बाटलीवरून दोघांत बोलचाल झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर राजेश याने त्याच्याजवळील देशीकट्टा काढला व विशाल चोपडे याच्यावर रोखला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. विशाल याने घटनेची माहिती डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत राजेश राऊत याला पकडले. त्याच्याजवळून पोलिसांनी देशीकट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३0६, ५0६, आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.