अकोला जिल्ह्यातील ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 03:03 PM2019-07-08T15:03:34+5:302019-07-08T15:03:40+5:30
अकोला: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
अकोला: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ४७ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये १९ हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी तर २८ पोलीस नाईक यांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शनिवारी पदोन्नतीचा आदेश दिला.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार मिळणाºया पदोन्नतीच्या आदेशाची प्रतीक्षा होती. अखेर शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात आदेश काढून सेवाज्येष्ठतेनुसार १९ हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी तर २८ पोलीस नाईक यांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचाºयांमध्ये राजेश अहीर, शेख इक्बाल शेख ईस्माईल, दीपक प्रल्हाद पुंडगे, सुनील घुसळे, सुनील वाघ, श्रीकृष्ण डांगे, अरुण गावंडे, अशोक मिश्रा, बाळकृष्ण नलावडे, एकनाथ चक्रनारायण, रवींद्र कावळ, मो. फजनुर रहेमान फारूख अली, मो. असलम शेख हुसेन, अविनाश पांडे, देवकृष्ण हिवसे, श्रीकृष्ण इंगळे, मोहन फरकाडे, कैलास गोपनारायण, शुभ्रमणी जामनिक यांचा समावेश आहे. तर पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या २८ पोलीस कर्मचाºयांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली असून, यामध्ये सुरेश दुबे, संजय भारसाकळे, राजेश पंचभाई, प्रमोद शिरसाट, अजय अंबुसकर, रामेश्वर गावंडे, रमेश सावजी, प्रवीण गावंडे, कैलास दय्या, विजय बासंबे, सदाशिव मार्गे, विलास नाफडे, सुरेश काळे, हिंमत दंदी, संजय खंडारे, राजेश गावंडे, गणेश पातुरकर, गजानन भगत, अनिसखा हुरखा, अनिल मोरे, भारत इंगळे, विश्वास तायडे, नरेंद्र अंबुलकर, राजेंद्र इंगळे, ज्ञानदेव मेंढे, दत्तात्रय चव्हाण, राजेश रायबोले, विजयकुमार काकड यांचा समावेश आहे.