अकाेला जिल्ह्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 10:59 AM2021-05-20T10:59:35+5:302021-05-20T11:00:01+5:30

Akola News : १७८ काेटी ७३ लक्षचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव बुधवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा मंत्री ना़ गुलाबराव पाटील यांच्याकडे सादर केला़.

Proposal of 178 crore for water supply schemes in Akala district | अकाेला जिल्ह्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटींचा प्रस्ताव

अकाेला जिल्ह्यातील पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटींचा प्रस्ताव

Next

अकाेला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह विविध तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना प्रशासकीय अनास्थेमुळे थंडबस्त्यात आहेत़. काही याेजना राज्य शासनाने मंजूर केल्या असल्या तरी पुरेशा निधी अभावी त्या रखडल्याची परिस्थिती आहे़. त्यामुळे जिल्ह्यात मुर्तिजापूर, पातूर, बाळापूर व अकाेला येथील चार पाणीपुरवठा याेजनांसाठी १७८ काेटी ७३ लक्षचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव बुधवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा मंत्री ना़ गुलाबराव पाटील यांच्याकडे सादर केला़.

ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच पाणीटंचाइच्या समस्येला सामाेरे जावे लागते़ आजराेजी जिल्ह्यात खांबाेरा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना, ८४ खेडी व ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जाताे़. यामध्ये अनेकदा तांत्रिक त्रुटी निर्माण हाेउन पाणीपुरवठा खंडित हाेताे़ अशा याेजनांच्या देखभाल दुरूस्तीसाठसाठी शासन दरबारी ठाेस प्रयत्न हाेत नसल्याने तसेच यासंदर्भात प्रशासकीय अनास्था दिसत असल्याने काही याेजना बंद पडल्याचे दिसून येते़. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाइ निर्माण हाेउन ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते़. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील अशा प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत असलेल्या याेजना तसेच नळ याेजनांच्या दुरुस्तीसाठी सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पाणीपुरवठा मंत्री ना़ गुलाबराव पाटील यांच्याकडे १७८ काेटींचा प्रस्ताव सादर केला़.

 

चार याेजनांसाठी प्रस्ताव सादर

प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेंतर्गत व्याळा (१२ गावे)नवीन याेजनेसाठी ७५ काेटी रुपये, खारपाणपट्ट्यातील लाखपूरी (मुर्तिजापूर) (१७ गावे) नवीन याेजनेसाठी ४३ काेटी रुपये, देउळगाव-पास्टूल (पातूर)नळ याेजना दुरूस्तीसाठी ५ काेटी ७३ लक्ष तसेच अकाेला तालुक्यातील खांबाेरा नळ याेजना दुरूस्तीसाठी ५५ काेटींच्या प्रस्तावाचा समावेश आहे़.

Web Title: Proposal of 178 crore for water supply schemes in Akala district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.