विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:24+5:302021-02-13T04:18:24+5:30

तत्कालीन भाजप - शिवसेना युतीच्या कालावधीत एलइडी पथदिव्यांसाठी राज्य शासनाने दहा काेटींचा निधी मंजूर केला हाेता. यामध्ये महापालिकेच्या चाैदाव्या ...

Proposal for construction of three electric poles | विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव

विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव

Next

तत्कालीन भाजप - शिवसेना युतीच्या कालावधीत एलइडी पथदिव्यांसाठी राज्य शासनाने दहा काेटींचा निधी मंजूर केला हाेता. यामध्ये महापालिकेच्या चाैदाव्या वित्त आयाेगातून दहा काेटींचा निधी जमा करण्यात आला. एकूण २० काेटी रुपयांतून पाेल उभारणे व त्यावर एलइडी पथदिवे लावण्यासाठी पुणे येथील मे.राॅयल इलेक्ट्रिकल कंपनीची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, केंद्र शासन प्रमाणित इइएसएल कंपनीला संपूर्ण शहरातील महापालिकेच्या खांबांवर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नियुक्त करण्यात आले. इइएसएलमार्फत सुमारे २८ काेटी रुपयांतून पथदिवे लावण्याचे काम प्रगतिपथावर आहे. असे असले तरी चार ते पाच प्रमुख रस्त्यांवर पथदिवे उभारणीसाठी विद्युत खांब नसल्यामुळे एलइडी दिवे लावण्यात आले नसल्याचे चित्र आहे. विद्युत खांब उभारणीसाठी मनपाने सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेतून तीन काेटी ३८ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला.

या रस्त्यांसाठी विद्युत पाेलचा प्रस्ताव

शहरातील नेकलेस राेड, निमवाडी लक्झरी बस स्टॅंड ते सिटी काेतवाली, सिटी काेतवाली ते थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क, गाेरक्षण राेडवरील भाेले किराणा ते क्रांती चाैक या प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये विद्युत पाेलची उभारणी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

असा आहे प्रस्ताव

मुख्य चार रस्त्यावरील दुभाजकामध्ये पथदिव्यांचे खांब उभारणे- १ काेटी १३ लाख रुपये

महावितरणच्या दाेन विद्युत खांबात जास्त अंतर असल्याने अशा ठिकाणी नवीन खांब उभारणे- १ काेटी ६८ लाख ५० हजार

मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचे खांब उभारणे- ५७ लाख ३२ हजार रुपये

Web Title: Proposal for construction of three electric poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.