इतिवृत्तातून कॅफोवर कारवाईचा प्रस्ताव वगळला!

By admin | Published: April 18, 2017 01:45 AM2017-04-18T01:45:57+5:302017-04-18T01:45:57+5:30

सभापती अरबट यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

The proposal to take action on the Café dropped from the history! | इतिवृत्तातून कॅफोवर कारवाईचा प्रस्ताव वगळला!

इतिवृत्तातून कॅफोवर कारवाईचा प्रस्ताव वगळला!

Next

अकोला : जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा सचिव मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनीच संपवण्याचा प्रकार १० एप्रिल रोजी घडला. त्या सभेत आधीच्या सभेचे इतिवृत्त न ठेवल्याने सचिवावर जबाबदारी निश्चित करून कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्याचे निर्देश सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिले होते. मात्र, ते आदेशच सभेच्या इतिवृत्तातून वगळून सभापतींची दिशाभूल केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
अर्थ समितीची सभा सोमवारी बोलावण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेवर गेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, हा विषयच नव्हता. ही बाब सदस्या रेणुका दातकर, ज्योत्स्ना बहाळे यांनी उपस्थित केली. त्यावर सभापती अरबट यांनी सभेच्या सचिव म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांना विचारणा केली. त्यावर गेल्या वर्षीच्या सभेतही हा विषय घेण्यात आला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
विषय न ठेवण्याबाबत काही नियम आहे का, अशी विचारणा केली असता नागर यांनी इतिवृत्त २३ मार्चच्या सभेत ठेवल्याने यावेळी ठेवले नाही, असे सांगितले. नागर यांच्या उत्तराने समाधान होत नाही, असे सांगत रेणुका दातकर यांनी त्यांना धारेवर धरले. त्यामुळे नागर यांनी अनावधानाने ही चूक झाल्याचे मान्य केले.
आता वेळेवरच्या विषयामध्ये इतिवृत्त घेऊ, असेही सुचवले. मात्र, सभापती अरबट यांनी चूक झाली असेल, तर सभेच्या सचिवावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे सांगितले. त्यामुळे नागर यांची तारांबळ झाली. सभापतींची परवानगी न घेता स्वत:च सभा संपल्याचे सांगत त्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले.

हा मुद्दाही वादाचा ठरणार!
त्या सभेचे इतिवृत्त तयार करून स्वाक्षरीसाठी सभापती अरबट यांच्याकडे पाठवण्यात आले. मात्र, त्यामध्ये सचिवांनी चूक झाल्याचे मान्य करणे, कारवाईसाठीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करणे, याबाबींचा उल्लेखच नाही. त्यामुळे सभापतींचे निर्देश इतिवृत्तांतून का वगळण्यात आले, हा मुद्दाही आता वादाचा होणार आहे.

Web Title: The proposal to take action on the Café dropped from the history!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.