‘सावित्री’ करणार महिलांचे रक्षण

By admin | Published: March 18, 2015 11:35 PM2015-03-18T23:35:00+5:302015-03-18T23:35:00+5:30

राज्यात लवकरच सुरु होणार १८१ क्रमांकाची हेल्पलाईन.

Protecting the women to 'Savitri' | ‘सावित्री’ करणार महिलांचे रक्षण

‘सावित्री’ करणार महिलांचे रक्षण

Next

खामगाव (जि. बुलडाणा) : परिस्थितीमुळे अनेक अडचणींना तोंड देत असलेल्या महिला, तसेच रात्री अपरात्री संकटात सापडलेल्या महिलांसाठी आता सावित्री हेल्पलाईन वरदान ठरणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, ही हेल्पलाईन लवकरच सुरु होणार आहे.
गतवर्षी दिल्ली येथे २३ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. त्यावेळी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी महिलांच्या मदतीसाठी १८१ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने ही हेल्पलाईन सर्वच राज्यात सुरु होत आहे.
महाराष्ट्रात ही हेल्पलाईन सुरु करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. महिलांना सुरक्षेची खात्री देणार्‍या या हेल्पलाईनसाठी कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षणही देण्यात आले असून लवकरच ही हेल्पलाईन प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. सावित्री (स्टेट वाईड अँप फॉर व्हच्र्युएल इंटिग्रेशन ऑर ट्रॅकिंग अँन्ड इन्फॉर्मेशन) हेल्पलाईनवर फोन करताच संबंधित महिलेपर्यंंत काही मिनिटातच मदत पोहोचणार आहे. ही हेल्पलाईन पोलिस प्रशासनाशी कनेक्ट असणार आहे. संकटग्रस्त महिलेला मदत मिळेपर्यंंत हेल्पलाईनव्दारे तिच्याशी संपर्कात राहता येणार आहे.

*अशी राहिल कार्यपध्दती
ही हेल्पलाईन पोलिस प्रशासनाशी कनेक्ट असणार आहे. यामुळे संकटग्रस्त महिलेने हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर मोबाईल ट्रॅक करुन जवळील पोलिस चौकीला महिलेच्या ठिकाणाची माहिती दिली जाणार आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचून महिलेला मदत करतात की नाही, याची उलटतपासणीही हेल्पलाईनव्दारे केली जाणार आहे. त्यामुळे जर संबंधित महिलेच्या कॉलला पोलिस प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही, तर संबंधित पोलिस अधिकार्‍यांची तक्रार वरिष्ठांकडे केली जाणार आहे.

Web Title: Protecting the women to 'Savitri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.