मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 11:01 AM2020-09-11T11:01:41+5:302020-09-11T11:02:07+5:30

यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा देण्यात आल्या.

Protests against Maratha reservation suspension order | मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवन ते सिव्हिल लाइन चौकदरम्यान निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मराठा आरक्षणाला अंतरिम बंदी घालण्यात आली आहे. २०२०-२१ या वर्षामध्ये मराठा आरक्षण उपलब्ध होणार नसून, आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असल्याने या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हिल लाइन येथे मराठा समाजबांधवांनी एकत्र येत सर्वप्रथम मराठा समाजाचे नेते दादाराव मते पाटील यांना श्रद्धांजली वाहून बैठकीस सुरुवात केली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. अभय पाटील, विनायकराव पवार, कृष्णा अंधारे, अशोक पटोकार, प्रा. प्रदीप चोरे, गुलाबराव पाटील आदींनी विचार मांडले. त्यानंतर एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सिव्हिल लाइन चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Protests against Maratha reservation suspension order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.