वीज ग्राहकांना अपघात विरहित सेवा द्या - मुख्य अभियंता भादिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:48 PM2018-05-02T14:48:04+5:302018-05-02T14:48:04+5:30

अकोला : जनमित्र व यंत्रचालक यांचा ग्राहकांशी थेट संबंध असल्याने त्यांनी दिलेल्या सेवेतून व कायार्तून महावितरणची प्रतिमा निर्माण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. बदलत्या काळाबरोबर सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांशी सात्यत्याने सुसंवाद राखून अपघात विरहीत सेवा देण्याचे आवाहन मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले.

Provide accidentless services to electricity consumers - Chief Engineer | वीज ग्राहकांना अपघात विरहित सेवा द्या - मुख्य अभियंता भादिकर

वीज ग्राहकांना अपघात विरहित सेवा द्या - मुख्य अभियंता भादिकर

Next
ठळक मुद्देमुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.अकोला परिमंडळातील एकूण ३९ गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तांत्रिक कर्मचा-यांचा गौरव आयोजित कार्यक्रम.


अकोला : जनमित्र व यंत्रचालक यांचा ग्राहकांशी थेट संबंध असल्याने त्यांनी दिलेल्या सेवेतून व कायार्तून महावितरणची प्रतिमा निर्माण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. बदलत्या काळाबरोबर सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकांशी सात्यत्याने सुसंवाद राखून अपघात विरहीत सेवा देण्याचे आवाहन मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले.
महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे मंगळवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्य मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असणा-या महावितरणच्या अकोला परिमंडळातील एकूण ३९ गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त तांत्रिक कर्मचा-यांचाही गौरव आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. महावितरण कंपनी ही आपली असून तिच्या भरभराटीसाठी दिलेल्या कामात स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले.

सदर कार्यक्रमामध्ये अकोला मंडल १३, बुलढाणा मंडल १८ आणि वाशीम मंडल ०८ अशा निवडक यंत्रचालक व जनमित्र यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व सेवेबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी मार्गदर्शन करताना, महावितरणच्या कर्मचाº्यांनी संघटीतपणे व सामुहिकपणे हार्ड सोबतच स्मार्ट वर्क करून ग्राहकांना तत्पर सेवा दिली पाहिजे, वीज बिल वसुली, अचूक व नियमित देयके, यंत्रणेची वेळेवर देखभाल दुरुस्ती आणि अपघातमुक्त महावितरण या बाबींना सर्वांनी प्राथमिकता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय दिनोरे, विजय महाजन उपस्थित होते. तसेच पृथ्वीराज वानखडे, क्षीरसागर आणि लहाने या तांत्रिक कर्मचा-यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुशील देशमुख यांनी केले.

 

Web Title: Provide accidentless services to electricity consumers - Chief Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.