‘एमआयडीसी’मध्ये तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 02:28 AM2017-07-26T02:28:55+5:302017-07-26T02:28:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत औद्योगिक वसाहत परिसरात मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले.
या बैठकीला प्रामुख्याने महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नीलेश निकम उपस्थित होते. एमआयडीसी अंतर्गत प्लॉटधारकांना वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा योग्य रीतीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असून, त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन, उपाययोजना करण्याचे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. या बैठकीत अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल, नितीन बियाणी, विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय पनपालिया यांनी एमआयडीसी परिसरातील विविध समस्यांबाबत तक्रारींची माहिती जिल्हाधिकाºयांना दिली. त्यावर समस्यांचे निराकरण तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय दिले. या बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘एमआयडीसी’ परिसरात लवकरच सिटी बस सेवा!
एमआयडीसी परिसरात लवकरच सिटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त अजय लहाने यांनी या बैठकीत दिली. एमआयडीसी परिसरात फायर स्टेशन कार्यान्वित करणे, ग्रोथ सेंटर ते शिवनी-शिवापूर रस्ता, ट्रान्सपोर्ट नगर रस्त्याचे रुंदीकरण, नेहरू पार्क ते एमआयडीसीपर्यंत रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण इत्यादी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.