अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:05+5:302021-09-09T04:24:05+5:30
अकाेला : गेल्या दाेन दिवसांत पावसाने जिल्हाभरात माेठे नुकसान केले असून, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ...
अकाेला : गेल्या दाेन दिवसांत पावसाने जिल्हाभरात माेठे नुकसान केले असून, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेऊन केली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आ. सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपचे शिष्टमंडळ बुधवारी जिल्हाधिकारी निमा अराेरा यांना भेटले त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीची माहिती देऊन अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीला ५० पेक्षा जास्त दिवस उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली नाही. याकडे लक्ष वेधत त्यांनी सर्वेक्षणच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आराेप केला. यावेळी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने, शंकरराव वाकोडे, अभिमन्यू नळकांडे, माधव मानकर, अंबादास उमाळे, राजेश बेले, ज्ञानेश्वर ठाकरे, व्यंकट ढोरे, श्रीकृष्ण मोरखडे, प्रवीण हगवणे, तेजराव थोरात, मनीराम टाले, किशोर पाटील उपस्थित हाेते.