७९९ जोडप्यांचे प्रलंबित अनुदान द्या, अन्यथा आंदोलन

By admin | Published: July 3, 2014 01:26 AM2014-07-03T01:26:20+5:302014-07-03T01:41:03+5:30

अकोला समाजकल्याणच्या ‘कन्यादान’ योजनेंतर्गत ७९९ जोडप्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित.

Provide a pending grant of 7 99 couples, otherwise the agitation | ७९९ जोडप्यांचे प्रलंबित अनुदान द्या, अन्यथा आंदोलन

७९९ जोडप्यांचे प्रलंबित अनुदान द्या, अन्यथा आंदोलन

Next

अकोला : समाजकल्याण विभागाच्या ह्यकन्यादानह्ण योजनेंतर्गत सन २0१३-१४ या वर्षात सामूहिक विवाह सोहळ्यातील ७९९ जोडप्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.अनुदानाची प्रलंबित रक्कम शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भोई समाज सेवा संघाच्या अकोला जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आला आहे.
सन २0१३-१४ या वर्षात अकोला जिल्हय़ातील विविध सेवाभावी संस्थांमार्फत घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीतील ७९९ जोडपी विवाहबद्ध झाली. या सर्व जोडप्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे जोडप्यांच्या अनुदानाचे ७९ लाख ९0 हजार तसेच संस्थांच्या अनुदानाचे १५ लाख ९८ हजार असे एकूण ९५ लाख ८८ हजारांचे अनुदान शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वाडेगाव येथील भोई समाज बहुद्देशीय मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. अनुदानाची रक्कम १५ दिवसात न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भोई समाज सेवा संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित संस्था पदाधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात येणार असल्याचे भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश वानखडे व इतर पदाधिकार्‍यांनी निश्‍चित केल्याचेही भोई समाज सेवा संघ जिल्हा शाखेच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Provide a pending grant of 7 99 couples, otherwise the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.