पशु-पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:59+5:302021-03-17T04:18:59+5:30
वणी रंभापूर : सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, दरम्यान जंगलातील पाणवठे आटले आहेत. शिवाय उलंगवाडी झाल्याने पशू, पक्ष्यांना चारा, ...
वणी रंभापूर : सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, दरम्यान जंगलातील पाणवठे आटले आहेत. शिवाय उलंगवाडी झाल्याने पशू, पक्ष्यांना चारा, पाणी नसल्याने भटकंती होत आहे. पशू व पक्ष्यांची तहान, भूक भागविण्यासाठी पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेतर्फे उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत पशुपक्ष्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेने बोरगाव मंजू, अन्वी मिर्झापूर, वणी रंभापूर, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी पशू व पक्ष्यांना अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरण संवर्धन संस्थेचे सर्पमित्र कुमार सदाशिव, सर्पमित्र सूरज सदाशिव, सत्यसागर चौरपागर, राजेश रायबोले, प्रवीण वाघमारे, गजानन वानखडे, योगेश तायडे, सचिन वानखडे, प्रफुल सदाशिव, सर्पमित्र प्रशांत नागे, रवी शिरसाठ, निशांत डोंगरे आदी परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम स्वखर्चाने राबवणार, अशी माहिती पर्यावरण संवर्धन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र कुमार सदाशिव यांनी दिली. (फोटो)