अकोला जिल्ह्यातील १९५ गावाचा वीज पुरवठा पुर्ववत

By Atul.jaiswal | Published: April 8, 2023 06:16 PM2023-04-08T18:16:01+5:302023-04-08T18:17:19+5:30

वादळाच्या प्रचंड वेगामुळे अनेक ठिकाणी झाडे,झाडाच्या फांद्या उन्मळून वीज वाहिन्यात अडकले होते.

Provision of electricity supply to 195 villages in Akola district | अकोला जिल्ह्यातील १९५ गावाचा वीज पुरवठा पुर्ववत

अकोला जिल्ह्यातील १९५ गावाचा वीज पुरवठा पुर्ववत

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात प्रचंड वादळसाह झालेल्या पावसामुळे वीज यंत्रणा विस्कळीत होऊन जिल्ह्यातील १९५ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.परंतु महावितरणच्या अभियंतानी व जनमित्रांनी तत्काळ व युध्दस्तरावर दुरूस्ती कार्याला सुरूवात केल्याने १९५ गावाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (७ एप्रिल) चक्रीवादळासह झालेल्या पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील महावितरण यंत्रणेला बसला. परिणामी जिल्ह्यातील ३३ केव्ही माना,३३ केव्ही गायगांव,३३ केव्ही वनी रंभापूर,३३ केव्ही सोनोरी,३३ केव्ही हातरून,आणि ३३ केव्ही कुरूम ही उपकेंद्रे अंधारात गेल्याने परिसरातील ११ केव्हीच्या ३६ वाहिन्यांवरील १९५ गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

वादळ थांबताच अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात अभियंते व जनमित्रांकडून युध्दस्तराव वीज दुरूस्तीच्या प्रयत्नाला सुरूवात करण्यात आली.वीज खांब ते वीजखांब असे वीज वाहिन्यांचे पेट्रोलींग करण्यात आले.जमेल तसा पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बहुतांशी गावाचा वीज पुरवठा मध्यरात्रीपर्यंत पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकरही जिल्ह्याच्या वीज परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. रात्रीचा अंधार व पावसामुळे वीज साहित्य वाहनासाठी अडथळा निर्माण झाल्याने उर्वरीत काही गावाचा वीज पुरवठा शनिवारी पुर्ववत करण्यात आला आहे. तसेच वयक्तिक तक्रारी व फ्युजकॉल दुरूस्तीचे काम रात्रीपर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

महावितरणला मोठा फटका

वादळाच्या प्रचंड वेगामुळे अनेक ठिकाणी झाडे,झाडाच्या फांद्या उन्मळून वीज वाहिन्यात अडकले होते. त्यामुळे जिल्ह्यात उच्चदाबाचे १३१ आणि लघूदाबाचे ३५६ वीज खांब तुटले किंवा पडले . विजा चमकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. अनेक ठिकाणी वीज खांबावर विजा पडल्याणे ११ केव्हीचे ३०६ चिनीमातिचे डिस्क इन्सुलेटर आणि ४७६ पीन इन्सुलेटर तडकून फुटले. तसेच ३३ केव्हीचे १९८ डिस्क इन्सुलेटर आणि १७२ पीन इन्सुलेटर फुटलेत. शिवाय विभागात १८ किमीच्या उच्च व लघूदाब वाहीन्या क्षतीग्रस्त झाल्याने महावितरणला याचा मोठा आर्थीक फटका बसला आहे.

Web Title: Provision of electricity supply to 195 villages in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला