पाणीपुरवठा योजनेसाठी ९१ कोटींची तरतूद
By admin | Published: January 7, 2016 02:31 AM2016-01-07T02:31:21+5:302016-01-07T02:31:21+5:30
अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा योजनेचा नव्याने आरा खडा तयार.
आशीष गावंड/अकोला : अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा योजनेचा नव्याने आरा खडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ९१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या प्रकल्प अहवालाविषयी (डीपीआर) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शासनाचे पत्र प्राप्त झाले. यापूर्वी शहर पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाला स्पष्ट नकार देणार्या मजीप्राने डीपीआर तयार करण्याचे काम मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत, हे विशेष. केंद्र शासनाने अमृत योजनेसाठी अकोला शहराची निवड केली. अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना आणि शहराची पाणीपुरवठा योजना नव्याने तयार करण्याचा समावेश आहे. या दोन्ही योजनांसाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होणार असून, केंद्र शासनाच्या निर्देशानुसारच कामकाज केले जाईल. मध्यंतरी केंद्र शासनाच्या वेबसाइटवर महापालिका प्रशासनाने भूमिगत गटार योजनेची माहिती अपलोड केली होती. यादरम्यान, पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करून त्यासाठी २१0 कोटींची तरतूद करण्याचे पत्र महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मु ख्यमंत्र्यांना दिले. त्यानुसार अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ९१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीची तरतूद केल्यानंतर योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासंदर्भात शासनाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पत्र प्राप्त झाले. अकोला शहराची पाणीपुरवठा योजना पुन्हा एकदा मजीप्राकडे सोपविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेतील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांची संम ती असताना ही योजना स्वीकारण्यास मजीप्राने शासन दरबारी स्पष्ट नकार दिला होता. आता मात्र पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तयार करण्याचे काम मिळावे, म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने मनपा प्रशासनाला पत्र दिले आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नियुक्त करण्याचा ठराव देण्याची मागणी मजीप्राने केली आहे. या मुद्यावर महापालिकेतील सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.