पं. स. सभापती-उपसभापतींची आज निवड!

By admin | Published: June 28, 2016 02:24 AM2016-06-28T02:24:05+5:302016-06-28T02:24:05+5:30

अकोला जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड मंगळवारी होणार.

Pt S Today's Chairperson-Vice President! | पं. स. सभापती-उपसभापतींची आज निवड!

पं. स. सभापती-उपसभापतींची आज निवड!

Next

अकोला: जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड मंगळवार, २८ जून रोजी करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर कोणत्या पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले असून, सभापती व उपसभापती पदावर कोणाकोणाची निवड होते, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर सातही पंचायत समितींच्या विद्यमान सभापती व उपसभापतींचा अडीच वर्षांंचा कालावधी संपत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सातही पंचायत समितींच्या सभापती-उपसभापतींची निवड २८ जून रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजता सातही पंचायत समितींच्या विशेष सभा बोलविण्यात आल्या असून, या विशेष सभांमध्ये पंचायत समितींच्या नवीन सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सभापती व उपसभापती पदांसाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंंत तहसीलदार तथा पीठासीन अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात येतील. त्यानंतर होणार्‍या विशेष सभांमध्ये उमेदवारी अर्जांंची छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर सभापती-उपसभापती पदांसाठी सदस्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, सभापती व उपसभापतीपद मिळवून, पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी पूर्ण झाली असून, कोणकोणत्या पक्षाला सभापती आणि उपसभापती पद मिळणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pt S Today's Chairperson-Vice President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.