हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:15+5:302020-12-22T04:18:15+5:30
सिमेंट रस्त्याला पडल्या भेगा अकाेला : नेहरू पार्क ते गाेरक्षण या मार्गावरील सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या असून, संबंधित ...
सिमेंट रस्त्याला पडल्या भेगा
अकाेला : नेहरू पार्क ते गाेरक्षण या मार्गावरील सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या असून, संबंधित कंत्राटदाराने डागडुजी केली आहे, मात्र या भेगांवरून रस्ताचे काम याेग्य दर्जाचे झाले नसल्याचे स्पष्ट हाेत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर शास्ती लावण्याची मागणी आहे.
गोशाळेमध्ये गायत्री यज्ञ
अकाेला : येथील मधुवत्सल गोसेवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानमध्ये गायत्री यज्ञ भक्तिभावात झाला. यावेळी गोपूजनाकरिता प्रमुख यजमान नीलेश नातणकर हे होते. यावेळी गायत्री परिवाराचे प्रचारक सुरेश राठी यांच्या सहयोगी गायत्री परिवाराच्या प्रचारक कुमारी अर्पिता पावडे व शोभाताई इंगोले यांंनी गायत्री यज्ञ करून घेतला. याकरिता गोसेवक सेवाधारी विलास देशपांडे. ओमप्रकाश गावंडे, सुनील कांबळे, दत्तात्रय मसने, जानराव वाणेटकर, प्रमोद इंगोले, युवराज ठाकरे, चंद्रकांत कावरे पाटील, विजय सांगळे, योगेश कातखेडे, नितीन कातखेडे, विशाल इंगोले, अजय असोलकार, बबनराव ताठरकर, हरिष असोलकार, सोपान असोलकार, रोहन टायलकर, ओम इंगोले, गोरी इंगोले, ईश्वरी टायलकर, विद्या मसने, गीता मसने, शीतल मसने यांंनी गोशाळेमध्ये येऊन गोसेवा केली. संचालन मधुवत्सल गोशाळेचे अध्यक्ष ह.भ.प.भागवताचार्य तुलसीदास महाराज मसने यांंनी केले, तर आभारप्रदर्शन विशालभाऊ इंगोले यांंनी केले.
गाडगेबाबांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला : महादेवराव भुईभार
अकोला : विवेकप्रिय, अज्ञान,अंधश्रद्धामुक्त समाज निर्मितीसाठी समाज संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धेविरुद्धा कठोर लढा दिला, असे प्रतिपादन महादेवराव भुईभार यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त देशमुख पेठेतील कर्मयोगी गाडगेबाबा कर्मभूमीत अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड, नुटाचे पदाधिकारी प्रा. डाॅ. विवेक हिवरे, संत गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले, कर्मयोगी गाडगेबाबा स्मारक समितीचे सुरेश काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज जगताप, विवेक वाहिनीचे हर्षल पाटील, अनिल अनासने, सचिन काळे, ज्ञानेंद्र पर्वते, विशाल मडावी, संध्या प्रजापती यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन आकाश इंगळे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.