दारूबंदीसाठी जनजागृती यात्रा
By Admin | Published: September 28, 2015 02:09 AM2015-09-28T02:09:57+5:302015-09-28T02:09:57+5:30
संग्रामपूर तालुक्यातील अस्तित्व महिला संघाच्यावतीने २८ सप्टेंबरपासून जनजागृती यात्रा काढण्यात येणार.
खामगाव (जि. बुलडाणा ): जिल्ह्यात दारूबंदीसाठी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील अस्तित्व महिला संघाच्यावतीने २८ सप्टेंबरपासून जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन दारूच्या दुष्परिणामांची माहिती देऊन गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांंंपासून या संघाच्यावतीने दारूबंदीविरोधात जिल्ह्यात लढा पुकारण्यात आला आहे. त्या अंतर्गतच ही यात्रा काढण्यात येणार आहे. संत सोनाजी महाराज मंदिरातून सोमवारी या जनजागृती यात्रेस प्रारंभ होईल. यात्रेदरम्यान प्रामुख्यने महिलांशी चर्चा करून दारूबंदीसाठी त्यांना प्रवृत्त करण्यात येणार आहे. प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार असून, एक ऑक्टोबरला यात्रेचा समारोप होईल. त्यानंतर अस्तित्व महिला संघातर्फे संपूर्ण जिल्हा दारूबंदीसाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे.