सावकाराने महिलेस विष पाजले

By admin | Published: August 9, 2014 01:54 AM2014-08-09T01:54:27+5:302014-08-09T01:54:27+5:30

बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडीमहाला येथील एका महिलेस सावकाराने विष पाजल्याची तक्रार.

Public liver poisoned women | सावकाराने महिलेस विष पाजले

सावकाराने महिलेस विष पाजले

Next

अकोला: बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडीमहाला येथील एका महिलेस सावकाराने विष पाजल्याची तक्रार महिलेचा पती रामधन राठोड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले की, भेंडीमहाला येथील शेत सर्वे नंबर ४५/३ या ही शेती रामधन राठोडयांच्या मालकीची आहे. या शेतीवर गजानन देशमुख यांच्याकडून एक लाख रू पये व्याजाने घेतले होते या बदल्यात खरेदी खत तयार करू न दिले. काही दिवसानंतर मी उसणे घेतलेले एक लाख रूपये घेऊन गेलो असता देशमुख यांनी शेत परत करण्यास चक्क नकार दिला तसेच ही शेती दुसर्‍याला विकण्याचा प्रयत्न केला. दुय्यम निंबधक कार्यालयाला या व्यवहाराची कल्पना असल्याने शेती घेण्यास कोणी तयार झाले नाही. सध्यास्थितीत या शेतात तूर व सोयाबीन पेरले होते. परंतु गजानन देशमुख, गंगाराम पुरा पवार, योगेश राजाराम देशमुख, मंगेश दादाराव भाकरे यांनी एमएच ३0 ५३१४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने पिक मोडले. व दुसर्‍या पिकाची पेरणी केली.

Web Title: Public liver poisoned women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.