अर्थसंकल्पाच्या तयारीत आता जनतेचा सहभाग!
By admin | Published: December 2, 2015 02:45 AM2015-12-02T02:45:14+5:302015-12-02T02:45:14+5:30
वित्त विभागाचा निर्णय : व्यक्ती, संस्थांच्या सूचनांना मिळणार बक्षीस.
अकोला : राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा महसूल वाढविण्याबाबत सामान्य नागरिकांकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; तथापि अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम असल्यामुळे सामान्यांना त्यासाठी सूचना करणे शक्य नसते. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाच्या तयारीत जनतेच्या सूचना, कल्पना मागविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने ३0 नोव्हेंबर रोजी घेतला असून, जनतेकडून आलेल्या उत्कृष्ट सूचनांना शासनातर्फे बक्षीसही देण्यात येणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना राज्याच्या उत्पन्नाचे नवे स्रोत, त्याचप्रमाणे प्रशासनातील खर्चामध्ये बचतीच्या अभिनव योजना सुचविण्यासाठी आर्थिक बाबींशी निगडित तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेचा सहभाग वाढावा, या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण सूचना मागविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने सवरेत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे. जनतेला आपल्या सूचना पत्रस्वरूपात पाठवता येतील. ही सूचनापत्रे वित्त मंत्री वा अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या नावे वित्त विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर पाठवावीत. याशिवाय ह्यआपले सरकारह्ण या संकेतस्थळावर ऑनलाइन सहभागी होता येईल. सूचना पाठविणार्यांनी पत्रावर किंवा लिफाफ्यावर ह्यअर्थसंकल्पाच्या तयारीसाठी सूचनाह्ण असे ठळकपणे लिहावे. सदर सूचना ३१ डिसेंबरपर्यंंत पाठविणे क्रमप्राप्त आहे. सवरेत्कृष्ट सूचनांसाठी बक्षिसांचे स्वरुप सवरेत्कृष्ट प्रथम सूचना-१0 लाख रुपये. सवरेत्कृष्ट द्वितीय सूचना-७.५0 लाख रुपये. त्यानंतरच्या सवरेत्कृष्ट २५ सूचना -१ लाख रुपये प्रत्येकी समिती गठित जनतेने शासनास पाठविलेल्या सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील. संबंधित विभागामार्फत निवडलेल्या व सचिवस्तरावरील अभियाप्रायास आलेल्या सूचना अंतिम करण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. सदर समिती प्राप्त सूचनांची छाननी करेल व बक्षीसपात्र सूचनांचा क्रम ठरवेल.