‘बाबाराव मुसळे नावाचा माणूस व त्यांचे साहित्य’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:00+5:302021-03-14T04:18:00+5:30
अकोला : शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील मराठीचे विभाग प्रमुख डॉ. शिवाजी नागरे यांनी लिहिलेल्या ‘बाबाराव मुसळे नावाचा माणूस व त्यांचे ...
अकोला : शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील मराठीचे विभाग प्रमुख डॉ. शिवाजी नागरे यांनी लिहिलेल्या ‘बाबाराव मुसळे नावाचा माणूस व त्यांचे साहित्य’ या पुस्तकाचा प्रकाशन साेहळा ऑनलाइन पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ताराताई हातवळणे होत्या. यावेळी सचिव गोपाल खंडेलवाल, प्रा. डॉ. केशव देशमुख नांदेड, प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले औरंगाबाद, प्रा. डॉ. किशोर सानप व प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. केशव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डाॅ. किशोर सानप यांनी विचार व्यक्त केले. सोबतच लेखक बाबाराव मुसळे यांनी वाङ्मयाची पार्श्वभूमी विशद केली. डाॅ. केशव देशमुख यांनी पुस्तकाची समीक्षा केली. गोपाल खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. ताराताई हातवळणे यांनी बाबाराव मुसळे यांच्या साहित्याबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. डिंपल मापारी यांनी तर आभार डॉ. रावसाहेब काळे यांनी मानले. कार्यक्रमाला आभासी पद्धतीने रसिक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.