पल्स पोलिओ मोहीम; १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:00 PM2019-03-08T13:00:55+5:302019-03-08T13:01:08+5:30
अकोला: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, १० मार्च रोजी राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
अकोला: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, १० मार्च रोजी राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
पोलिओ निर्मूलनाची यशस्वीता नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्वच बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी जिल्ह्यात १ हजार ३९३ बुथवर लसीकरण करण्यात येणार आहे. बुथवर लसीकरण न झालेल्या बालकांसाठी ग्रामीण भागात तीन दिवस तर शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. वीटभट्टी व बांधकामे स्थलांतरित वस्त्यांना भेट देऊन लसीकरण केले जाईल. यासाठी ट्राझिट टीम व मोबाइल टीम तयार करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण देऊन राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीषा शर्मा यांनी केले.
विभाग - बुथ - लाभार्थी
ग्रामीण - १०२३ - १ लाख ४,४३९
शहरी - १२० - २६, ३८४
महापालिका - २५० - ५७,१०३