अकोला जिल्ह्यात १.२६ लाख चिमुकल्यांना देणार पल्स पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 10:40 AM2021-01-30T10:40:23+5:302021-01-30T10:43:13+5:30

Pulse polio vaccine यंदा कोविड लसीकरणामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जवळपास आठवडाभर उशिरा सुरू होत आहे.

Pulse polio dose to be given to 1.26 lakh Childrens in Akola district | अकोला जिल्ह्यात १.२६ लाख चिमुकल्यांना देणार पल्स पोलिओ डोस

अकोला जिल्ह्यात १.२६ लाख चिमुकल्यांना देणार पल्स पोलिओ डोस

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागामार्फत पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण झाली.पोलिओ लसीकरणासाठी ग्रामीण भागात ९७० बूथ राहणार आहेत.ग्रामीण भागात ३० आणि शहरी भागात ३० ट्रान्झिटिव्ह टीम गठित.

अकोला: कोविड लसीकरणामुळे यंदा पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील १.२६ लाख चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे दिले जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण झाली. यंदा कोविड लसीकरणामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जवळपास आठवडाभर उशिरा सुरू होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागासह महापालिका आरोग्य विभागाचीही तयारी पूर्ण झाली आहे. पोलिओ लसीकरणासाठी ग्रामीण भागात ९७० बूथ राहणार असून त्यामध्ये सुमारे ९६ हजार ४३५ मुलांना पोलिओ डोज दिला जाणार आहे. शहरी भागात ११७ बूथ राहणार असून, या ठिकाणी ३० हजार १७६ चिमुकल्यांना पोलिओ डोज देण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात ३१४ बुथवर ५९ हजार २९८ चिमुकल्यांना पोलिओचा डोज दिला जाणार आहे. ग्रामीण भागात ३० आणि शहरी भागात ३० ट्रान्झिटिव्ह टीम गठित करण्यात आल्या आहेत. यासह ग्रामीण भागात ६३ आणि शहरी भागात १६, तर महापालिका क्षेत्रात १७ मोबाईल पथके राहणार आहेत. मोहिमेंतर्गत आरोग्य विभागामार्फत रविवारी सर्वच शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी पोलीओ लसीकरण केले जाईल. तसेच आशा आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ लस देणार आहे. नागरिकांनी आपल्या पाल्यांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

० ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थी - १.२६ लाख

पोलिओ डोज प्राप्त - २ लाख २५ हजार ४८७

एकूण बुथ - १,४०१

अशी चालेल मोहिम

मोबाईल पथक - ९६

ट्रान्झिट पथक - ३०

लसीकरणाची वेळ - सकाली ८ ते सायं. ५

 

पल्स पोलिओ लस प्राप्त

जिल्ह्यात पल्स पोलिओची एकूण २ लाख २५ हजार ४८७ डोज प्राप्त झाले. त्यापैकी ७१ हजार डोज महापालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगाटातील चिमुकल्यांसाठी आहे.

मोहिमेंतर्गत सर्वच शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी पोलिओ लसीकरण केले जाईल. तसेच आशा आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ लस देणार आहे.

पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना रविवार ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओचे ‘दोन थेंब जीवनाचे’ द्यावे.

- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला

Web Title: Pulse polio dose to be given to 1.26 lakh Childrens in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.