अकोला जिल्ह्यात १९ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसिकरण मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:44 PM2020-01-03T16:44:15+5:302020-01-03T16:44:22+5:30

आरोग्य पथक बसस्थानक, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, पालावरील भटके जाती-जमाती कुटुंबातील मुलांना लसीकरण करणार आहेत.

A pulse polio vaccination campaign in Akola district from January 19 | अकोला जिल्ह्यात १९ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसिकरण मोहीम!

अकोला जिल्ह्यात १९ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसिकरण मोहीम!

googlenewsNext

अकोला : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला १९ जानावेरीपासून सुरुवात होत आहे. मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाने जिल्ह्यातील एक लाख ८२ हजार ७५७ बालकांना लसिकरणाचे उद्दिष्ट ठरविले असून, त्यासाठी जनजागृतीला सुरुवात केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात गुरुवारी आरोग्य विभागाची बैठक झाली. यावेळी १९ जानेवारीपासून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसिकरण मोहीमेची रुपरेषा ठरविण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओची लस दिली जाणार असून, यापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना केली. लसीकरण मोहिमेसाठी ग्रामीण भागात केंद्रे असून, शहरी भागातही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागात २१ जानेवारी ते २३ जानेवारी व २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या दरम्यान घरोघरी जावून ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना लस दिली जाणार आहे. एकही बालक लसीपासून वंचित राहणार नाही, असे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. आरोग्य पथक बसस्थानक, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, पालावरील भटके जाती-जमाती कुटुंबातील मुलांना लसीकरण करणार आहेत. मोहिमेसाठी जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पर्यवेक्षण करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचाºयांचा मोहिमेत सहभाग राहणार आहे.

मिशन इंद्रधनुष मोहीम सोमवारपासून
मिशन इंद्रधणूष्य मोहिमेंतर्गत जे बालक लसिकरणापासून वंचित राहिले आहेत, अशांसाठी सोमवार ६ जानेवारीपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
 

 

Web Title: A pulse polio vaccination campaign in Akola district from January 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.