तूर खरेदी केंद्र यावर्षी लवकर सुरू होणार; फेडरेशनच्यावतीने नियोजनास सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:01 PM2018-12-21T13:01:26+5:302018-12-21T13:01:36+5:30

अकोला : मागील काही वर्षांचा अनुभव बघता, यावर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनने सुरू केल्या असून, खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठीच्या नियोजनावर भर दिला आहे.

Pulses Purchase Center to be started this year soon | तूर खरेदी केंद्र यावर्षी लवकर सुरू होणार; फेडरेशनच्यावतीने नियोजनास सुरुवात 

तूर खरेदी केंद्र यावर्षी लवकर सुरू होणार; फेडरेशनच्यावतीने नियोजनास सुरुवात 

Next

अकोला : मागील काही वर्षांचा अनुभव बघता, यावर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनने सुरू केल्या असून, खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठीच्या नियोजनावर भर दिला आहे; पण या महिन्यात तूर बाजारात येणे सुरू होणार असल्याने शेतकºयांचे लक्ष आॅनलाइन नोंदणीकडे लागले आहे. दरम्यान, शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही खरेदी केंद्र दिले जाणार आहे.
फेडरेशनने तालुका स्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी वरील दोन्ही संस्था नसतील, तेथील सहकारी संस्थेचे व वर्ग सभासद घेऊन तूर खरेदी केंद्र दिले जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही शर्ती व अटीच्या आधारावर खरेदी केंद्र दिले जाणार आहे. ज्या शर्ती-अटी टाकण्यात आल्या आहेत, त्यासंबंधी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला जोडणे अनिवार्य आहे.
मागील वर्षी गोदामामुळे तूर खरेदीवर परिणाम झाला होता. याच अनुषंगाने यावर्षी गोदाम असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच वखार महामंडळाच्या साठवणुकीपूर्वी संस्थेचे किंवा भाड्याचे गोदाम असणे अनिवार्य करण्यात आले आहे. संस्थांना अनेक अटी घालण्यात आल्याने आता किती संस्था तूर खरेदीसाठी तयार होतात, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
मागील दोन वर्षे तूर उत्पादक शेतकºयांची लूट झाली. हमीदरापेक्षा कमी दराने शेतकºयांना व्यापाºयांना तूर विकण्याची वेळ आली होती. एकरी तूर विक्रीचे निकषही अनेक वेळा बदलण्यात आल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला होता.

- तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून, संस्था निश्चित झाल्यानंतर आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
के. एम. क्यावल,
अधिकारी,
दि. महाराष्टÑ स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशन लि.

 

Web Title: Pulses Purchase Center to be started this year soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.