पंचनामे केले; पण बियाण्याची मिळाली नाही रक्कम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 04:20 PM2020-08-23T16:20:48+5:302020-08-23T16:20:56+5:30
शेतकºयांच्या खात्यात बियाण्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील विविध जिल्ह्यांत पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाच्या पथकांनी पंचनामे केले. त्यानुसार सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकऱ्यांना बियाण्याची रक्कम देण्याची प्रक्रिया ‘महाबीज’मार्फत सुरू करण्यात आली असली; तरी खासगी बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्याची रक्कम शेतकºयांना देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांच्या खात्यात बियाण्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणीनंतर अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून कृषी विभागाकडे करण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाच्या तालुकास्तरीय पथकांमार्फत सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या शेतांमध्ये पंचनामे करण्यात आले असून, पंचनाम्यांच्या प्रती संबंधित बियाणे कंपनींकडे देण्यात आल्या. त्यानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाण्याची रक्कम देण्याची प्रक्रिया ‘महाबीज’ मार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये काही शेतकºयांच्या बँक खात्यात बियाण्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, बहुतांश शेतकºयांना अद्याप बियाण्याची रक्कम मिळाली नाही.
सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाण्याची रक्कम देण्याची प्रक्रिया ‘महाबीज’कडून सुरू करण्यात आली असली तरी, खासगी बियाणे कंपन्यांचे बियाणे घेतलेल्या शेतकºयांना सोयाबीन बियाण्याची रक्कम देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे बियाण्याची रक्कम संबंधित बियाणे कंपन्यांकडून शेतकºयांना केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२२ एकर शेतात पेरलेले महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. तसेच २० एकर क्षेत्रावर पेरलेले खासगी कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. यासंदर्भात कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले; परंतु संबंधित बियाणे कंपन्यांकडून बियाण्याची रक्कम अद्याप मिळाली नाही.
-विजय चतरकर
शेतकरी, कापशी, ता. अकोला.
कृषी विभागाकडून प्राप्त पंचनाम्यानुसार, पडताळणी करून सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात बियाण्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-अनिल भंडारी
व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.
सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांच्या शेतांमधील पंचनामे करण्यात आले असून, पंचनाम्यांच्या प्रती संबंधित बियाणे कंपनींकडे देण्यात आल्या आहेत.
-मोहन वाघ
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी