सॅटेलाईटद्वारे होणार नुकसानीचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:23+5:302021-04-07T04:19:23+5:30

मागील महिन्यात जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळिराजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान ...

Punchnama of loss due to satellite! | सॅटेलाईटद्वारे होणार नुकसानीचे पंचनामे!

सॅटेलाईटद्वारे होणार नुकसानीचे पंचनामे!

Next

मागील महिन्यात जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळिराजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट तालुक्यात गहू, लिंबू, पपई, कांदा बियाणे पीक, आंबा, कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, कांदा पिके जमीनदोस्त झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने विभागीय कृषी संचालक यांना सादर केला. यामध्ये ५ हजार २१७ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचे सांगितले. पिकांचे नुकसान होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे; परंतु पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता हे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत न करता सॅटेलाईटच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. प्राथमिक अहवालाच्या आधारे तपशील पाठविण्याचे पत्र कृषी संचालक यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

Web Title: Punchnama of loss due to satellite!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.