अवैध उत्खनन झाल्याबाबतचा पंचनामा तहसीलदारांकडे सादर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:47+5:302021-09-18T04:20:47+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील टाकळी, खेट्री परिसरातील शासकीय जागेतून वाळूचे उत्खनन झाल्याबाबतचा पंचनामा शुक्रवारी तहसीलदारांकडे सादर करण्यात आला आहे. ...

Punchnama submitted to Tehsildar regarding illegal excavation! | अवैध उत्खनन झाल्याबाबतचा पंचनामा तहसीलदारांकडे सादर!

अवैध उत्खनन झाल्याबाबतचा पंचनामा तहसीलदारांकडे सादर!

googlenewsNext

खेट्री : पातूर तालुक्यातील टाकळी, खेट्री परिसरातील शासकीय जागेतून वाळूचे उत्खनन झाल्याबाबतचा पंचनामा शुक्रवारी तहसीलदारांकडे सादर करण्यात आला आहे.

टाकळी, खेट्री परिसरातील शासकीय जागेतून वाळूचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारा अवैध वाहतुकीमुळे शेतरस्त्याची ऐशीतैशी झाल्याने शेतकऱ्यांनी थेट पातूरच्या तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यामुळे तहसीलदार दीपक बाजड यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंडल अधिकारी व तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष पंचनामा करून शुक्रवारी तहसीलदारांकडे सादर केला आहे. तसेच पातूरचे नायब तहसीलदार सय्यद ऐहसानोद्दीन यांनीसुद्धा शुक्रवारी उत्खनन झाले होते, त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील शासकीय जागेतून गेल्या दोन महिन्यांपासून वाळूचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारा शेकडो ब्रास अवैध वाहतूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष!

वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे शेतरस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली सस्तीचे मंडल अधिकारी एन. आर. बडेरे, तलाठी मिलिंद इचे यांनी पंचनामा करून तो तहसीलदारांकडे सादर केला आहे. या पंचनाम्यावर तहसीलदार पुढे काय कारवाई करतात, याकडे टाकळी, खेट्री परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Punchnama submitted to Tehsildar regarding illegal excavation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.