अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

By Atul.jaiswal | Published: June 16, 2023 01:26 PM2023-06-16T13:26:22+5:302023-06-16T13:27:05+5:30

या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असणार आहे.

pune amravati express running via akola got extension till july 30 | अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला मिळाली ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext

अतुल जयस्वाल, अकोला: गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. २ जुलैपर्यंत नियोजित असलेली ही गाडी आता २८ व ३० जुलैपर्यंत धावणार आहे. अप व डाऊन मार्गावर आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असणार आहे.

मध्य रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस येत्या ३० जून ते ३० जुलैपर्यंत दर शुक्रवार व रविवारी पुणे येथून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परभणी, हिंगोली या मार्गे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी (शनिवार व सोमवार) दुपारी २.५५ वाजता अकोला रेल्वेस्थानकावर पाेहोचणार आहे. ५ मिनिटांच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होणार आहे. गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस येत्या १ जूलै ते ३१ जुलैपर्यंत दर शनिवार व सोमवारी अमरावतीवरून ७ वाजून ५० मिनिटांनी रवाना होऊन बडनेरा-मूर्तिजापूर मार्गे त्याच दिवशी रात्री २१.२० अकोला स्थानकात दाखल होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी (रविवार व मंगळवार) दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पुणे रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.

Web Title: pune amravati express running via akola got extension till july 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.