पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार

By Atul.jaiswal | Published: January 29, 2024 07:30 PM2024-01-29T19:30:45+5:302024-01-29T19:30:59+5:30

अप व डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

Pune-Amravati special train will run till the end of March | पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार

पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार

अकोला: सणासुदीच्या दिवसांत वाढलेली गर्दी व प्रवाशांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेने अमरावती व पुणे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेला मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अप व डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २८ जानेवारीपर्यंत अधिसुचीत असलेले गाडी क्र. ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस २ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी व रविवारी पुणे स्थानकावरून रात्री २२:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १७:३० वाजता अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस ३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत शनिवार व सोमवारी अमरावती स्थानकावरून १९:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १६:२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.

Web Title: Pune-Amravati special train will run till the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.