सम्यक विद्यार्थी आंदोलनने अकोल्यात जाळला पुणे विद्यापिठाचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:42 PM2017-11-11T18:42:46+5:302017-11-11T18:45:44+5:30
अकोला : पुणे विद्यापिठाकडून दिल्या जाणाºया शेलारमामा पुरस्कारासाठी अर्ज सादर करणारा विद्यार्थी इतरही काही अटींसोबत तो शाकाहारी असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. हा प्रकार प्रकार म्हणजे, शाकाहारी नसलेल्या विद्यार्थ्यांना कमी लेखण्यासारखा आहे. त्याचा निषेध करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन अमरावती विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर पुणे विद्यापिठाचा पुतळा प्रतिकात्मक जाळण्यात आला.
- सदानंद सिरसाट

पुणे विद्यापिठाकडून शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये विज्ञान शाखेव्यतिरिक्त पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थी शाकाहारी असावा ही चुकीची अट लावण्यात आली. तसेच विशिष्ट संस्कृतीचा हा धार्मिक असावा, हे दडपण टाकण्यासाठी पुरस्काराच्या आवाहनात अटी टाकण्यात आल्या. त्यातच विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, परंपरा मानणारा व स्वताच्या जीवनात आचरण करणारा असावा, असेही म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे, इतर परंपरा, धर्म, संस्कृतीला मानणाºया विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जाणार नाही का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांवर विशिष्ट संस्कृती व धार्मिक संस्कृतीचे दडपण टाकण्यात आले आहे. विद्यापिठाच्या या एकांगीपणाचा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने निषेध केला. त्यासाठी विद्यापिठाचा प्रतिकात्मक पुतळा राष्ट्रीय महामार्गावर जाळण्यात आला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख सचिन शिराळे, अमरावती विभागाचे अध्यक्ष नितेश कीर्तक,जिल्हा अध्यक्ष अमोल समाधान सिरसाट, राजकुमार दामोदर, अविनाश भगत, डॉ. मनिष खंडारे, योगेश कीर्तक, प्रेमकुमार वानखडे, निकी डोंगरे, रितेश कीर्तक, सुमेध आ. वानखडे, आनंद वानखडे, भुषण पातोडे, सोहन दांडगे, धीरज पांडे,विकेश जगताप, रोहन वानखडे, रवी दामोदर उपस्थित होते.